ज्येष्ठ क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं नवी दिल्ली इथं निधन झालं. ते६६ वर्षांचे होते. १९८३ सालच्या विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय चमूत त्यांचा सहभाग होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शर्मा यांच्या निधनाबद्दलदुःख व्यक्त केलं आहे. १९८३ च्या विश्वचषकस्पर्धेतल्या काही महत्त्वाच्या सामन्यातली त्यांची खेळी आजही स्मरणात आहे, अशाशब्दात राष्ट्रपतींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यशपाल शर्मा हे संपूर्ण संघाचे आवडते खेळाडू होते. त्यांचं क्रिकेटमधलं योगदान सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशातयशपाल शर्मा यांना आदरांजली वाहीली आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही यशपालशर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यशपाल शर्मा यांचं क्रिकेट साठीचं योगदानकायम स्मरणात राहील. १९८३ च्या विश्वकप मधली त्यांची खेळी कधीच विसरता येणार नाही,असंही ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image