चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांचं प्रमाण २ टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल करण्यात आलेल्या १६ लाख ४७ हजार ४२४ चाचण्यांमध्ये ३४ हजार ७०३ कोरोनाबाधित आढळले असल्याचं केंद्रिय आरोग्य विभागानं आज सकाळी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण २ पुर्णांक १ दशांश टक्के असून आतापर्यंतच्या बाधितांची संख्या आता ३ कोटी ६ लाख १९ हजार ९३२ झाली आहे. यापैकी २ कोटी ९७ लाख ५२ हजार २९४ म्हणजेच ९७ पुर्णांक ११ दशांश टक्के रुग्ण बरे झाले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण आता २ टक्क्यांहून कमी झालं असून सध्या ४ लाख ६४ हजार ३५७ म्हणजेच १ पुर्णांक ५८ शतांश टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड १९ ची दैनंदिन मृत्यूसंख्या घटते आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासात ५५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. या रोगानं आतापर्यंत ४ लाख ३ हजार २८१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर १ पुर्णांक ३२ शतांश टक्के आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती सातत्यानं वाढत असून काल दिवसभरात लसींच्या ४५ लाख ८२ हजार २४६ मात्रा देण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात २९ कोटी ११ लाख ७२ हजार ३९० जणांना पहिली तर ६ कोटी ६३ लाख ८१ हजार २८२ जणांना दुसरी अशा एकंदर ३५ कोटी ७५ लाख ५३ हजार ६१२ मात्रा देण्यात आल्या आहेत.