२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया गत वेळेप्रमाणेच सुरू राहणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया गत वेळेप्रमाणेच सुरू राहणार असल्याचं UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे.

केंद्रीय विद्यापीठांची सामाईक परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून लागू केली जाऊ शकते, असं  UGC च्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.