आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शक्ती भोग फूड्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना अटक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं शक्ती भोग फूड्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना अटक केली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये ९ ठिकाणी केलेल्या तपास मोहिमेचा भाग म्हणून अटक करण्यात आली असून तपासा दरम्यान विविध गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. केवल कृष्णन आणि अज्ञात व्यक्तींविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारावर इडीने तपास मोहीम सुरु केली. केवल कृष्णन यांच्यावर कर्जाची रक्कम संशयास्पदरित्या काही संस्थांकडे वळवली असल्याचा आणि अवैध खरेदी आणि विक्री केल्याचा आरोप आहे, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image