भारतासोबत काम करण्यास नेपाळचे प्रधानमंत्री उत्सुक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ आणि भारत हे उभय देश आणि त्यातील नागरिक यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रधान नरेंद्र मोदीं सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी म्हंटल आहे.

काल नेपाळी संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्याबद्दल मोदी यांनी देऊबा यांचं ट्विटर संदेशाद्वारे अभिनंदन केलं होतं. त्याबद्दलही देऊबा यांनी मोदींचे आभार मानले आहेत.