एचआयव्ही एड्स विरोधातल्या लढाईत भारत सर्व देशांसोबत - केंद्रीय आरोग्य मंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एचआयव्ही एड्स विरोधातल्या लढाईत भारत सर्व देशांसोबत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. एचआयव्ही एड्स संबंधी संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५व्या अधिवेशनात ते आज बोलत होते.

भारताच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात संशोधन आणि सुधारणा करुन, या आजाराच्या प्रसाराचा सर्वात जास्त धोका असलेल्या भागापर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.