राज्यात उद्यापासून अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उद्यापासून अनेक ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिकांसह अनेक जिल्ह्यात प्रशासनाने यासंदर्भातले निर्देश प्रसिद्ध केले आहेत.

नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यासाठी शासनाची नियमावली लागू केली जाणार आहे. त्यानुसार उद्यापासून जीवनावश्यक दुकाने आणि आस्थापना दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील तर जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी लागू राहील.

वाशिम जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. वाढीव सवलतीसह नवीन नियमावली उद्या सकाळी ७ वाजल्यापासून जिल्ह्यात लागू होईल. मात्र, जिल्ह्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी आणि ५ नंतर संचारबंदी लागू राहील.

कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे परभणी जिल्हा प्रशासनानं उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी लागू राहणार आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image