लष्कर आणि पोलिस भरतीचे बोगस रॅकेट उद्धस्त

 

पुणे (वृत्तसंस्था) : लष्कर आणि पोलिस भरतीसह विविध प्रकारच्या भरतीसाठी चालविण्यात येणारे बोगस रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुण्यातून हे रॅकेट चालविले जात होते.

लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने लष्कराच्या दक्षिण विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हे शाखेने सोमवारी मध्यरात्री सोलापुरातून दोघांना अटक केली.

इच्छुक उमेदवारांकडून ४ ते ५ लाख रुपये घेऊन त्यांना भरतीचे खोटे आश्वासन त्यांच्याकडून दाखविले जात होते. यासाठी त्यांनी Territorial Army ची बनावट वेबसाइट सुरू केली होती. या माध्यमातून इच्छुक उमेदवारांची बोगस लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.