मराठा आरक्षणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : सकल मराठा समाज आणि इतर मराठा संघटनांच्या वतीनं मुंबईतल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चानं, आज बाईक रॅली काढली. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं काढलेली ही बाईक रॅली मुंबईत चेंबूरच्या एव्हराड नगर इथून पोलिसांच्या बंदोबस्तात रवाना झाली आणि आझाद मैदान इथं संपली. या रॅलीमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही, आमदार कालिदास कोळंबकर, प्रल्हाद लाड सहभागी झाले होते. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करत असून या आंदोलनाचं वणव्यात रुपांतर होईल, असा इशारा प्रविण दरेकर यांनी या रॅलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.