देशभरात शनिवारी ८७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. देशभरात शनिवारी ८७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, ५८  हजार ४१९ नवे रुग्ण आढळले, तर १ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ कोटी ८७ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एकूण ३ लाख ८६ हजार ७१३ रुग्ण दगावले. देशभरात सध्या सुमारे ७ लाख २९ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.