देशातील कोविड मृत्यू संख्येबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी केलेले दावे पूर्णपणे निराधार- आरोग्य मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी केलेले दावे पूर्णपणे निराधार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ही संख्या निर्धारित करण्यासाठी या माध्यमांनी ज्या अहवालाचा वापर केला त्यांच्या प्रणालीला देशात मान्यता नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविडमृत्यूंची नोंद कडक दिशा निर्देश पाळून अत्यंत पारदर्शकपणे केली जात असून याबाबत जिल्हास्तरावर रोज आढावा घेतला जात असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.