छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे प्रकाशात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रं संशोधकांना परदेशात मिळाली आहेत. ही चित्रं १७व्या शतकातली आहेत आणि भारतातल्या दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली लहान आकारातील चित्रं आहेत.

भारतात आलेल्या तत्कालीन व्यापाऱ्यांकडून ती प्रथम युरोपात गेली आणि तिथल्या वेगवेगळ्या वस्तूसंग्रहालयांमध्ये ठेवली गेली.

इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी या चित्रांवर संशोधन केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर गेलेले असताना किंवा त्यावेळी काढलेल्या अन्य चित्रांच्या आधारे इसवीसन १७०० मध्ये ही चित्रं काढली गेलेली असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.