मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने गाठली ५३ हजार १२६ अंकांची सर्वोच्च पातळी

 

मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ-उतार झाले. सकाळच्या सत्रात निर्देशांक ५३ हजार १२६ अंकांच्या आजवरच्या सर्वाधिक उंच्चीवर पोचला होता. मात्र नंतर समभागाची  जोरदार विक्री सुरु झाली. त्यामुळे दिवसअखेर निर्देशांक १८९ अंकांनी  घसरुन ५२ हजार ७३५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ बाजाराचा निफ्टीही आज दिवसभरात एकदा १५ हजार ९१६ अंकांच्या नव्या उंच्चीवर पोचला होता. मात्र ही तेजी टिकली नाही आणि दिवसअखेर ४६ अंकांची घसरण नोंदवत. तो १५ हजार ८१५ अंकांवर बंद झाला.  दुसऱ्या बाजूला मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स मात्र तेजीत राहिले. बीएसई मिड कॅप २२ हजार ६३९ वर, तर बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स २५ हजार १११ अंकांवर बंद झाला.