सर्वसामान्य नागरीकांच्या अपेक्षांची पुर्तता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच करतील : शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील

 

पिंपरी : महाविकास आघाडी सरकारचे यशस्वी नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच सर्वसामान्य नागरीकांच्या अपेक्षांची पुर्तता करतील. राज्यातील युवकांचे आशास्थान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून हजारो युवक भगवा झेंडा घेऊन शिवबंधनात येत आहेत. त्याच प्रमाणे भोसरीतील भाजप पदाधिकारी व काही माजी शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये होणा-या महानगरपालिकांच्या निवडणूकीपुर्वी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश होतील त्याची ही नांदी आहे. यामुळे भोसरी विधानसभेत शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख ॲड. सचिन भोसले, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 12 जून) माजी खा. आढळराव पाटील यांनी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवबंधन बांधले. यावेळी त्यांचे स्वागत करताना आढळराव पाटील बोलत होते. यावेळी शैलेश उर्फ तुकाराम निवृत्ती मोरे, सुनिल भागुजी वाटे, श्रीकांत चन्नाप्पा करोली, बाबासाहेब गोविंद काळोखे, संदिप राघू चव्हाण, बटू काशीनाथ पाटील, किशोर अशोक शिनगारे, अशोक अश्रुबा चव्हाण, भारत एकनाथ नरवडे, संजय कृष्णा पाटील आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या आणि मनपामधिल पदाधिका-यांच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे. त्याचा निषेध करीत काही भाजपा पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत. भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या विश्वासू गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे आगामी काळात पुर्ण शहरातून अनेक कार्यकर्त्यांचे तसेच आजी, माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार असल्याची चाहुल आहे. शहर शिवसेनेची ताकद मनपा निवडणूकीत वाढण्यासाठी नियोजन सुरु आहे. आज ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचा पक्षवाढीसाठी निश्चितच उपयोग होईल असेही ॲड. सचिन भोसले म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image