टोकीयो ऑलिम्पिकसाठी निघालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांकडून प्रेरणादायी प्रोत्साहन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सुरू असलेला देशाचा लढा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत असलेला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशा अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मधून भाष्य केले.
१९६४ साली टोकीयोतच झालेल्या ऑलिंपिकमध्ये धावलेल्या मिल्खासिंग यांच्या स्मृतीना उजाळा देत टोकीयोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या अनुषंगाने MyGov ऍपवरच्या 'Road to Tokyo Quiz' या प्रश्नमंजुषेत अवश्य भाग घ्या असे आवाहन पंतप्रधानांनी केले. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अनेक खेळाडूंची उदाहरणे देत, त्यांच्या कष्टाला साहसाला जिद्दीला सलाम करत या खेळाडूंना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यातून आलेला प्रविण जाधव, हॉकीपटू नेहा गोयल, तीरंदाज दीपिका कुमारी, यांच्यासह अनेक उदाहरण देत मोदी यांनी खेळाडूंची जिद्द अधोरेखित केली.परिस्थितीशी दोन हात करून आता टोकीयोला निघालेले हे खेळाडू देशासाठी खेळणार आहेत, त्यांच्यावर अपेक्षांचं ओझ टाकू नका, त्यांना प्रोत्साहन द्या, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या मन की बात मध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या प्रवीण जाधव या खेळाडूचा उल्लेख केला. लष्कराच्या सेवेत असणाऱ्या प्रविणने २०१६ मध्ये पहीले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या मन की बात मध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या प्रवीण जाधव या खेळाडूचा उल्लेख केला.
लष्कराच्या सेवेत असणाऱ्या प्रविणने २०१६ मध्ये पहीले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय खडतर होता. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, जगण्याची लढाईही रोजचीच. मात्र, हार न मानता जणू नियतीचाच लक्ष्यभेद करत, साताऱ्याचा आंतरराष्ट्रीय तिरंदाज प्रवीण जाधव जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. फलटण तालुक्यातल्या सराडे या छोट्या गावात राहणारा प्रविण त्याचे आईवडील रमेश आणि संगीता यांच्याबरोबर वेठबिगारी करायचा. जिल्हा परिषदेच्या शाळेतले त्याचे क्रीडा प्रशिक्षक विकास भुजबऴ यांच्याकडे त्याचा सराव सुरू झाला पण जेवायला पुरेसे नसल्याने प्रवीणच्या अंगात कमालीचा अशक्तपणा होता. प्रशिक्षकांच्या सहकार्याने त्याच्या कामगिरीत सुधारणा होत होती. जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्यावर त्याच्यासाठी क्रीडाप्रबेधिनीची कवाडं खुली झाली. त्याच्या या प्रवासाविषयी बोलताना प्रशिक्षक विकास भुजबऴ म्हणतात.मुळचा अतिशय प्रामाणिक, समजूतदार, आज्ञाधारक, कष्टाळू आणि जिद्दी खेळाडू असल्यामुळे तो भरपूर गोष्टी आत्मसात करत गेला. पाठीमागे झालेल्या वल्ड कप स्पर्धेत त्याने देशासाठी रौप्यपदक मिळवून आणले आणि गेल्यावर्षीच तो ऑलिम्पिकसाठी जो कोटा असतो त्यामध्ये सिलेक्ट झाला. एक सामान्य घरातला जिल्हा परिषदेच्या शाळेतला गरीब होतकरू खेळाडू आज ऑलिम्पिक पर्यंत गेला आहे. आणि आमच्या सर्वांना अशी खात्री आहे की देशासाठी तो नक्कीच बदल घडवून आणेल. आज त्याच्या गरीब परिस्थितीतून एखाद्याने ठरवले तर काय होऊ शकत याच ज्वलंत उदाहरण म्हणजे हा प्रवीण आहे. २४ वर्षीय प्रविणला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तिरंदाजीमधल्या कारकीर्दीबरोबरच कौटुंबिक भविष्यही उज्ज्वल करायचे आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी त्याच्या कर्तृत्वाला, संघर्षाला दिलेली शाबासकीची थाप आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा त्याच्या यशाचा मार्ग सुकर करतील यात शंका नाही.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.