राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 1 जून 2021 पासून MHRD ( http://www.mhrd.gov.in)या संकेतस्थळावरील http://nationalawardstoteachers.education.gov.in/newuser.aspx  या लिंकवर नावनोंदणी सुरु झालेली आहे.

शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (नपा/मनपा/जिप) मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळा (प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक) शाळांमधील शिक्षक, पात्र मुख्याध्यापक ऑनलाईन आवेदन भरण्यास पात्र आहेत.

इच्छुक शिक्षकांनी दिनांक 20 जून 2021 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालय यांनी केले आहे.

Popular posts
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image