देशभरातील जिल्हा कार्यक्रमांमुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांचा सर्वंकश विकास, प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांनी सर्वंकश विकास साधला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघानं जारी केलेल्या एका अहवालात या कार्यक्रमाची प्रशंसा करत हा कार्यक्रम एक आदर्श असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या तीन वर्षात मागास तसंच नक्शल प्रभावीत जिल्ह्यांनी अपेक्षीत विकास साधला आहे, असं या अहवालात नमूद केलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातले प्रतिनिधी शोको नोडी यांनी हा अहवाल नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांना  काल सुपूर्द केला.या कार्यक्रमाचं योग्य अंमलबजावणी केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची या अहवालात प्रशंसा देखील केली आहे.

Popular posts
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image