मध्य रेल्वेवर महिला टीमकडून प्रथमच मालवाहतूक ट्रेनचं सखोल परीक्षण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड इथं १० जणींच्या महिला टीमनं मालवाहतूक ट्रेनचं सखोल परीक्षण केलं. कोविड आव्हानं असूनही, पुरवठा साखळी चालू ठेवण्यासाठी रेल्वे आवश्यक वस्तू आणि इतर साहित्याची वाहतूक करत आहे. मालवाहतूक करणा-या गाड्यांची काही ठराविक फे-यांनंतर नेमलेल्या ठिकाणी तपासणी केली जाते. 

मध्य रेल्वेवर प्रथमच मालवाहतूक करणाऱ्या रेकची/ट्रेनची सखोल तपासणी महिला टीमनं केली. अशा प्रकारचं काम करणारी ही पहिली महिला टीम आहे. स्टील लोडिंगसाठी वापरल्या जाणा-या अशा ४४ बीओएसटी प्रकारच्या रिक्त वॅगनच्या रॅकची तपासणी संपूर्ण महिला टीमने केली.