देशात आतापर्यंत ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या २८ कोटी ३६ हजाराहून जास्त मात्रा देशात आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. एकूण ५ कोटी १५ लाखांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर २२ कोटी ८० लाखांना एक डोस मिळाला आहे.

काल दिवसभरात ३० लाख ३९ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. त्यातल्या २५ लाख लाभार्थ्यांनी पहिली मात्रा घेतली तर ५ लाखाहून जास्त लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या ४ कोटी ७० लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत लस मिळाली आहे. काल त्यातल्या १५ लाखांना पहिली तर ६० हजारांना दुसरी मात्रा देण्यात आली.

Popular posts
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image