जगभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या १०० वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ महाविद्यालयांना स्थान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१ या वर्षासाठीच्या जगभरातल्या १०० सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांनी स्थान पटकावलं असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून कळवलं आहे. या कामगिरीबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या यादीत, नवी दिल्लीतलं एम्स २३व्या, पुण्यातलं वैद्यकीय महाविद्यालय ३४व्या स्थानावार आहे. याशिवाय वेल्लोर, पाँडिचेरी, चेन्नई आणि वाराणसी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांनीही या यादीत पहिल्या शंभरात स्थान मिळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वोत्तम होण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.