मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

वाशिम जिल्ह्यातल्या शेलुबाजार इथं एका आठवड्या नंतर पावसाला सुरुवात झाली असल्यानं शेतकरी आनंदून गेला असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना आधार झाला. काल रात्री जिल्ह्यातल्या हिमायतनगर, हदगाव, किनवट आणि धर्माबाद इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.