बीड शहरात आखणी २५ नव्या अंगणवाड्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं मागवून घ्यावा- यशोमती ठाकूर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बीड शहरात आखणी २५ नव्या अंगणवाड्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं मागवून घ्यावा असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. शहरात वर्षांखालच्या मुलांसाठी अनेक ठिकाणी अंगणवाड्या उपलब्ध नसल्यानं, २५ नव्या अंगणवाड्यांना मंजुरी देण्याची मागणी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला त्यासंदर्भात निर्देश दिले.