महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले

 

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसैनिक काम करीत आहेत. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील चाडेचार वर्षात भाजपाने केलेला भ्रष्ट्राचार आगामी काळात नागरीकांसमोर मांडू. आगामी काळात महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी रणनिती आखून शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शिवसेना प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केले.

शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन आकुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठे, शहर संघटिका ॲड. उर्मिलाताई काळभोर, कामगार नेते इरफान भाई सय्यद, युवा अधिकारी विश्वजीत बारणे, सरिता साने, उपशहरप्रमुख तुषार नवले, अनिल सोमवंशी, अमोल निकम, नवनाथ तरस, अनंता कोराळे, पांडुरंग पाटील, वैशाली कुलथे, शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहर संघटिका ॲड. उर्मिलाताई काळभोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 2022 मध्ये होणा-या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणूकीत मनपा भवनावर भगवा फडकवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सर्वांनी एकजुटीने व्यूहरचना करुन योग्य रणनीती वापरून महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा असा निश्चय व्यक्त केला.

यावेळी ॲड. सचिन भोसले म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपाने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यात येतील. शहरवासियांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील. शहर शिवसेना या शहरातील लोकांचे हित जपण्याचं काम इथून पुढे करेल.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image