चाचणी केल्यावरच भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्या - नगराध्यक्षा साधना भोसले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी पालख्यांसमवेत येणाऱ्या भाविकांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केल्यावरच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे. भाविक लसीकरण करून आले तर स्थानिक नागरिकांना धोका कमी वाटेल अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथल्या संत ज्ञानेश्वर महाराज- माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यावरून आळंदीचे गावकरी आणि वारकरी यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पालखी सोहळा यावर्षीही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा व्हावा, अशी आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी आहे. तर पालखी सोहळा पायी व्हावा यावर वारकरी ठाम आहेत.