मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं काल मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या आयोगाची मुदत संपुष्टात आल्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. नव्या सदस्यांमध्ये प्राचार्य बबनराव तायवाडे, चंद्रलाल मेश्राम, बालाजी किल्लारीकर, संजीव सोनावणे, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलिमा सराप, डॉ. गोविंद काळे, प्राचार्य लक्ष्मण हाके आणि अलका राठोड यांचा समावेश आहे.