भारतीय नौदलाच्या ताफ्यात एएलएच एमके-3 ही तीन हेलिकॉप्टर दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या ताफ्यात काल एएलएच एमके-३ ही स्वदेशी बनावटीची तीन हेलिकॉप्टर दाखल झाली. किनारपट्टीवरील सुरक्षा आणि गस्त घालण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीनं तयार केलेली ही हेलिकॉप्टर नौदलाच्या पूर्व विभागात विशाखापट्टण इथल्या आयएनएस डेगा इथं तैनात असतील. या हेलिकॉप्टरमध्ये रडारसह गस्तीसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपकरणं बसवण्यात आली आहेत.

या उपकरणांच्या साह्यानं समुद्रात दीर्घ पल्ल्यावर आणि रात्रीच्या वेळीही गस्त घालता येणार आहे. याशिवाय कारवाई करण्यासाठी हेलिकॉप्टरवर मशीनगनही बसवण्यात आली आहे.