अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे अब्दुल सत्तार यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. सत्तार यांनी काल महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात सुरु असेलेल्या बांधकांमांमधे व्यवसायिकांनी किती गौण खनिज वापरलं, किती बाहेर विकलं यासंदर्भातला तपासणी अहवाल सादर करायचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे, महसूल यंत्रणेनं योग्य वसुली केली तर राज्याच्या तिजोरीला काही प्रमाणात भारभार लागू शकतो ही बाबही त्यांनी या बैठकीत नमूद केली. 

महसूल विभागाच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यासाठीच्या रिक्त पदांना मंजूरी देण्यासाठी कार्यवाही करायचं, तसंच करमणूक कर विभागातले अधिकारी आणि कर्मचारी महसूल विभागाकडे वर्ग करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवून कार्यवाही करायचं आश्वासनही सत्तार यांनी या बैठकीत दिलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image