डी.सी.जी.आयची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर लसीची चाचणी करण्यास मान्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन या कोविडप्रतिबंधक लसीची २ ते १८ वयोगटासाठीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली मानवी चाचणी घ्यायला परवानगी दिली आहे. या संदर्भातल्या भारत बायोटेकचा प्रस्ताव मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विषय तज्ज्ञ समितीकडे आला होता.

समितीनं चाचणीला मान्यता द्यावी अशी शिफारस महानियंत्रकांना केली होती. ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेतली जाईल. चाचणीच्या काळात स्वयंसेवकांना २८ दिवसांमधे लसीच्या दोन मात्रा दिल्या जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी करण्याची शिफारस, तज्ञ समितीने केली होती. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर, समिती तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची शिफारस करणार आहे.