कोरोनाच्या तीसऱ्या लाटेनंतर मराठा मोर्चाची येणारी लाट भयानक असेल - वीरेंद्र पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या तीसऱ्या लाटेनंतर मराठा मोर्चाची येणारी लाट भयानक असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक वीरेंद्र पवार यांनी दिला आहे.

मुंबईसह महाराष्ट्र आणि देश एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी भयानक आहे. त्यामुळे मराठा समाज सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात नाही, असंही त्यांनी स्पष्टं केलं.

राज्य सरकारची त्याबाबतची भूमिका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील मुलांच्या खडलेल्या नियुक्त्या आणि मराठा समाजाची यापुढील भूमिका विषद करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.