वारकरी संप्रदायातील प्रमुख हभप बाबासाहेब महाराज यांचे निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातील प्रमुख प्रबोधनकार हभप बाबासाहेब महाराज इंगळे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ किर्तनकार, तब्बल ४० दशके कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचा महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार विनोदीशैलीतून केला.

एवढचं नाही तर वडवणी तालुक्यातल्या चिंचवडगाव इथल्या परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी गोर गरिबांच्या मुला मुलींचे लग्न अत्यल्प दरात लावून दिले. विविध साहित्य निर्माण करून त्याद्वारे महाराजांनी ग्रामीण भागात प्रबोधन केले. त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि तसेच आरोग्यमंत्री या सगळ्यांनीच आदरांजली वाहिली आहे.