वित्तीय संस्थांचा पतपुरवठा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे - शक्तिकांत दास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांखेरीजच्या वित्तपुरवठा कंपन्यांनी आणि सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांनी उचित व्यवहार आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारावी, आणि माहिती तंत्रज्ञानविषयक साधनं मजबूत करावी असा सल्ला रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. या वित्तीयसंस्थांच्या प्रमुखांबरोबर ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ने बोलत होते.

पतपुरवठा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे असं सांगून ते म्हणाले की व्यवसायात तग धरुन राहण्यासाठी जोखिमीचं व्यवस्थापन चतुराईने केलं पाहिजे.

सध्याच्या आर्थिक स्थितीत वित्तपुरवठा आणि रोखीची उपलब्धता या विषयांवरही यावेळी चर्चा झाली. रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर्स M. K. जैन, डॉ. M.D. पात्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.