बीसीसीआय देणार २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड विरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देणार आहे. येत्या दोन महिन्यात देशभरात या वैद्यकीय सामग्रीचं वाटप केलं जाईल, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं. वैद्यकीय आणि आरोग्यकर्मचारी देशाच्या कोविड विरुद्धच्या लढ्यात अखंड कार्यरत आहेत असं सांगत गांगुली यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.