शत्रू राष्ट्राची वैद्यकीय व्यवस्था नष्ट करण्यासाठीच चीनकडून कोविड विषाणूचा वापर : अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढा देत असताना या महामारीच्या प्रसाराबाबत चीनच्या भूमिकेविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. चीनमध्ये कोविड १९ चा वापर शस्त्र म्हणून केली गेली असल्याचं  अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडील कागदपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

तिसरे युद्ध पूर्णपणे जैविक शस्त्राने केले जाईल अस चिनी कमांडर्सनी भाकीत केल्याचं या कागदपत्रात म्हटलं आहे. शत्रूची वैद्यकीय व्यवस्था नष्ट होईल अशी जैविक शस्त्रे बनविण्याची योजना चिनी सैन्याने तयार केली होती असंही त्यात सांगण्यात आलं आहे. अमेरिकन अधिका-यांना मिळालेल्या कागदपत्रानुसार चिनी सैन्यातील शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ आरोग्य अधिका-यांनी २०१५ मध्ये ही योजना तयार केली होती.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image