सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यास येत्या १५ जून पासून प्रारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यास येत्या १५ जून पासून प्रारंभ होईल. कोविड महामरीमुळे या प्रक्रीयेला काहीसा उशीर झाला. या कामाच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एका वेबिनार मध्ये घेतला.

सोन्याच्या दागिन्यांची भारतीय मानकं जगात सर्वोत्तम असावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या देशात तयार झालेल्या फक्त ३० टक्के दागदागिन्यांना हॉलमार्कचं प्रमाणपत्र असते.