मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण बरे झालं आहेत. यामुळे राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४ पूर्णांक ३१ शतांश टक्के झालं आहे.
राज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल ५६ हजार ६४७ नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची एकूण संख्या ४७ लाख २२ हजार ४०१ वर पोचली आहे.
राज्यात रविवारी ६६९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ७० हजार २८४ झाली आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ४९ शतांश टक्के आहे.
राज्यात आतापर्यंत तपासलेल्या २ कोटी ७६ लाख ५२ हजार ७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक ८ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
पालघर जिल्ह्यात आज दिवसभरात १ हजार १५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. आत्तापर्यंत जिल्ह्यातले एकूण ६९ हजार ७१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या १८ हजार ४६४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
सिंधुदुर्गात आज कोरोनातून बरे झालेल्या १८८ जणांना डिस्चार्ज दिला गेला. आज जिल्ह्यातल्या २६३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, तर ११ रुग्ण दगावले. सध्या जिल्हाभरात २ हजार ९३८ बाधित उचरा गेत आहेत.
वाशिम जिल्ह्यात आज ५०३ रुग्ण कोरोनातून बरे झाले, तर ४२४ नवे बाधित आढळले. आज जिल्ह्यातल्या २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ३ हजार ९१९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
भंडारा जिल्ह्यात आज १ हजार ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडलं. जिल्ह्यात आज ५५० नव्या रुग्णांचीही नोंद झाली.
गडचिरोली जिल्ह्यात आज २३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ११ जणांचा मृत्यू झाला. आज जिल्ह्यातले ५५९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्यात ४ हजार ३८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.