सुरक्षित मालमत्ता मागणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : सुरक्षित मालमत्ता मागणीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले. महागाईची चिंता, नरमाईवरील डॉलर आणि कोव्हिड-19 यामुळे सराफा बाजारातील धातूची मागणी वाढली असून सोन्याच्या दरांनी ०.८ टक्क्यांचा मार्जिनल नफा अनुभवला. जगभरातील कमोडिटीच्या किंमत वाढीमुळे संभाव्य चलनवाढीचे वातावरणाची चिंता, यामुळे महागाईवरील उतारा म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडडे वळाले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या धोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा नफा काहीसा मर्यादित राहिला. 27-28 एप्रिल रोजी झालेल्या या बैठकीत, धोरणबदलातील भूमिकेमुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत मजबूत आणि निरंतर सुधारणा दिसून येत आहे, यावर सर्व अधिकाऱ्यांचे एकमत झाले. अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नातील घठ तसेच वाढती चलनवाढीची चिंता यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे पुढील आठवड्यात कदाचित सोन्याच्या दराबाबत थोडी खबरदारी बाळगली जाईल.
मागील आठवड्यात स्पॉट सिल्व्हरचे दर २.३ टक्क्यांनी कमी होऊन २७.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. तर एमसीएक्सवरील दर ३ टक्क्यांनी घसरून ७१,०४९ रुपये प्रति किलोवर स्थिरावले.
मागील आठवड्यात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ४ टक्क्यांनी घसरले. आशियातील संक्रमित कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या आणि तसेच इराणी तेलपुरवठा पुन्हा सुरु होण्याच्या चर्चा यासाठी कारणीभूत ठरल्या असल्याचे श्री. माल्या यांनी सांगितले. अनेक देशांतील वेगवान लसीकरणामुळे क्रूड तेल बाजारातील मागणीला सातत्याने आधार मिळत आहे. तथापि, भारतासारखा प्रमुख उपभोक्ता देशातील कमी मागणी आणि महागाईच्या चिंतेने येत्या काही दिवसात तेलाच्या दरांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.