राज्याचा कोरोना मुक्तीदर वाढून ९० टक्क्यांवर

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2020/12/NPIC-20201214103325.jpg

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली आहे.सोमवारी राज्यात ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २६ हजार ६१६  नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५१६ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ५ हजार ६८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ४८ लाख ७४ हजार ५८२ रुग्ण बरे झाले, तर एकूण ८२ हजार ४८६ रुग्ण दगावले. राज्यातला कोरोनामुक्तीचा दर आता ९० पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. तर मृत्युदर १ पूर्णांक ५३ शतांश टक्के आहे.राज्यात आतापर्यंत तपासलेल्या ३ कोटी १३ लाख ३८ हजार ४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक २५ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४५ हजार ४९५  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.