देशात काल ३ लाख २६ हजार ९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९च्या देशभरातल्या उपचाराधीन रुग्णसंख्येत आजही घट नोंदवली गेली. काल ३ लाख ५३ हजार २९९ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८ रुग्ण बरे झाले आहेत. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पुन्हा वाढू लागलं असून ते ८३ पुर्णांक ८३ शतांश टक्के झालं आहे. काल ३ लाख २६ हजार ९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. देशातली एकूण रुग्णसंख्या २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ वर पोचली. सध्या देशात कोविड१९च्या ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.काल ३ हजार ८९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. देशात आतापर्यंत बळी पडलेल्यांची संख्या आता २ लाख ६६ हजार २०७ झाली आहे. देशातला मृत्यूदर १ पुर्णांक ९ शतांश टक्के आहे.