देशात काल ३ लाख ४३ हजारांहून अधिक, तर राज्यात ४देशात काल ३ लाख ४३ हजारांहून अधिक, तर राज्यात ४२ हजार ५८२ नव्या कोविड रुग्णांची नोंद२ हजार ५८२ नव्या कोविड रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या काल ५ हजार ६३२ ने घटली. सध्या देशात ३७ लाख ४ हजार ८९३ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत ३ लाख  ४४ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले; आता पर्यंत एकंदर २ कोटी ७९ हजार ५९९ रुग्णांनी या आजारावर मात केली असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर साडे ८३ टक्के झाला आहे. देशात काल ३ लाख ४३ हजारांहून अधिक नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे बाधितांची एकंदर संख्या २ कोटी ४० लाखांवर गेली आहे. काल ४ हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली; त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता २ लाख ६२ हजार ३१७ झाली आहे.