मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ३४१ अंकांची घसरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज ३४१ अंकांची घसरण झाली आणि तो ४९ हजार १६२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९२ अंकांनी घसरुन १४ हजार ८५१ अंकांवर बंद झाला.  जागतिक बाजारामधले कमजोर कल आणि चलन फुगवट्याच्या भीतीमुळे ही घसरण झाल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं.

तेल आणि वायू, उपयुक्त वस्तू, औद्योगिक तसंच  भांडवली वस्तू क्षेत्रांमधल्या कंपन्याच्या समभागाची थोडी खरेदी झाली, मात्र धातू, बँकींग, वित्त सेवा, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज विक्रीच्या दबावाखाली राहिले.