त्रिकंड हे जहाज ऑक्सिजन घेऊन मुंबईत दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देत परदेशातून मदत सामग्री भारतात आणण्यासाठी भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर कार्य सुरु आहे. समुद्र सेतू मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, नौदलाचे त्रिकंड हे जहाज आज कतारवरून ४० मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन मुंबईत दाखल झाले.

फ्रान्ससोबत नौदलाचा युद्ध सराव सुरु असताना कोरोना संबंधित वैद्यकीय सामग्रीची मदत घेण्यासाठी विविध भारतीय युद्धनौकांना आखाती देशांमध्ये वळवण्यात आले.कोविड महामारीत भारताला मदत करण्यासाठी 'ऑक्सिजन एकता पूल' या फ्रेंच अभियानाच्या माध्यमातून हा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.

द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणण्यासाठी क्रायोजेनिक कंटेनर्स घेऊन हे जहाज पाच मे रोजी कतारमधल्या हमद बंदरावर दाखल झालं होतं. त्यांनतर आज तर मुंबईत दाखल झाले. या अभियानानंतर्गत येत्या २ महिन्यात ६०० मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणला जाणार आहेत. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image