मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज अकोल्याला भेट देऊन तिथल्या शोभादेवी गोयंका कोविड केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि सर्वोपचार रुग्णालयातल्या व्यवस्थेची पाहणी केली. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोविडबाधितांसाठी अधिकच्या २०० खाटांची वाढ करता यावी, याकरता मनुष्यबळ वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी या पाहणी दरम्यान बातमीदारांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारने दिलेले वेंटिलेटर लवकरात लवकर सुरू करायची जबाबदारी राज्य सरकारची असतानाही, काही नेते व्हेंटिलेटर खराब असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज अकोल्याला भेट देऊन तिथल्या शोभादेवी गोयंका कोविड केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि सर्वोपचार रुग्णालयातल्या व्यवस्थेची पाहणी केली.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोविडबाधितांसाठी अधिकच्या २०० खाटांची वाढ करता यावी, याकरता मनुष्यबळ वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी या पाहणी दरम्यान बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

केंद्र सरकारने दिलेले वेंटिलेटर लवकरात लवकर सुरू करायची जबाबदारी राज्य सरकारची असतानाही, काही नेते व्हेंटिलेटर खराब असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला