29 लाखाहून अधिक नागरिकांना काल मिळाली कोरोन प्रतिबंधक लसीची मात्र

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्त्तापर्यंत कोरोन प्रतिबंधक लसीच्या पहिली आणि दुसरी मिळून 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 मात्रा देण्यात आल्या. काल दिवस भरात 29 लाख 19 हजार 699 मात्रा देण्यात आल्या असून 27 लाख 25 हजार 111 जणांना लसीची पहिली मात्रा तर 1 लाख 94 हजार 588 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. लसींची टंचाई जाणवत असल्याची तक्रार काही राज्य करत असली तरी प्रत्यक्षात आज विविध राज्यांकडे मिळून 1 कोटी 84 लाख लसी शिल्लक आहेत असं केंद्रिय आरोग्य विभागान स्पष्ट केलं आहे.