देशभरात 20 कोटी 26 लाख 95 हजार आठशे 74 नागरिकांचं लसीकरण पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत 20 कोटी 26 लाख 95 हजार आठशे 74 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. काल दिवसभरात 18 लाख 85 हजार आठशे 5 नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्यानं लसीकरणाचा 20 कोटींचा टप्पा आतापर्यंत पार केला आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतानं 20 जानेवारी रोजी सुरू केली होती.