५४% भारतीय विद्यार्थी म्हणतात ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल सोयीस्कर: ब्रेनली

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2020/09/brainly-logo.png

मुंबई: सुमारे ५४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धती सोयीस्कर वाटत असल्याचे ब्रेनलीने केलेल्या नव्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मागील वर्षी भारतातील शिक्षण आणि शिकण्याची पद्धती कशी बदलत गेली हे समजून घेण्याच्या उद्दिष्टाने ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने ‘लॉकडाऊन अँड लर्न-फ्रॉम-होम मॉडेल’ शीर्षकाअंतर्गत हे नवीन सर्वेक्षण केले.

२,३७१ सहभागींच्या सँपलवर आधारीत या सर्वेक्षणातील सुमारे ५४ टक्के विद्यार्थ्यांनी आता ऑनलाइन शिक्षण पद्धती सोयीस्कर असल्याचे सांगितले. शाळा पुन्हा सुरू झाल्यावर कोणत्या शिक्षण पद्धतीला पसंती द्याल, असे विचारले असता, हेच उत्तर मिळाले. सर्वेक्षणातील निम्म्यापेक्षा जास्त सहभागींनी संमिश्र शिक्षण पद्धतीला पसंती दिली. मागील वर्षी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने विद्यार्थ्यांना भक्कम पाठींबा दिला. भारतातील चार पैकी दर एका विद्यार्थ्याने ब्रेनलीसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या शंका दूर केल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. इतरांनी शाळेतील शिक्षक (१७%) आणि पालक (८%) यांची मदत घेतली.

कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने सध्या पु्न्हा शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. ५६% विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवण्यास पसंती दर्शवली. सर्वेक्षणातील प्रमुख निरीक्षण म्हणजे, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे विद्यार्थ्यांना अधिक सक्षम वाटते. दोन तृतीयांश विद्यार्थी म्हणाले, ते पूर्वीपेक्षा अधिक लवचिक व स्वावलंबी झाले आहेत. त्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांना ‘आत्मविश्वास’ वाढल्याचा जाणवतोय. विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाने दावा केला की, अशा प्लॅटफॉर्ममुळे त्यांना स्वत:च्या गतीने शिकता येते. इतर पद्धतीत ही सुविधा नाही.

ब्रेनलीचे सीपीओ, राजेश बिसाणी म्हणाले, “ शिक्षणाच्या इतिहासात यापूर्वी ऑनलाइन लर्निंग चॅनल्सचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर वापर कधीही झाला नव्हता. आता बहुतांश विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शिक्षणासाठीचे ऑनलाइन साधनं कसे वापरायचे ते कळाले आहे. त्यामुळे संमिश्र शिक्षण पद्धती ही या उद्योगाच्या प्रगतीचा मार्ग असेल.”

ब्रेनली हा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यात सुमारे ३५० दशलक्षहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे सामूहिकरित्या शिक्षण प्रक्रियेत सहभागी होतात. प्लॅटफॉर्मवर भारतातील ५५ दशलक्षपेक्षा जास्त यूझर्स आहेत. तर अमेरिका, रशिया, इंडोनेशिया, ब्राझील आणि पोलंड इत्यादी देशांतील एक मोठा वर्ग प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे.