राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन


मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आधुनिक विचारांचे कृतीशील संत होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. भारत गावखेड्यांनी बनलेला देश असल्यानं गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, ही त्यांची श्रद्धा होती. त्यासाठी त्यांनी स्वत:ला ग्रामविकासाच्या कार्याला वाहून घेतले. खेड्यांच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला.

‘ग्रामगीते’च्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग सांगितला. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी, अस्पृश्यता, जातीभेदाच्या निर्मुलनासाठी लोकांचं प्रबोधन केलं. सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. विवेकवादी समाजनिर्मितीचं ध्येय ठेवून लोकजागृतीचं काम केलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image