ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं काल सायंकाळी पुसद इथं निधन झालं. ते ९६ वर्षाचे होते.

कर्नाटकातल्या जमखंडी गांवचे रामभाऊ १९४५ साली गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात दाखल झाले. पुढं त्यांनी विनोबांच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतलं. विनोबा साहित्य प्रकाशित करणाऱ्या परंधाम प्रकाशनाच्या उभारणीत त्यांचं मोठन योगदान होतं. विनोबांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेलं ‘निरोप्या’ हे पुस्तक भूदान यात्रेच्या काळात लोकप्रिय झालं. विनोबांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी पाच खंडात प्रसिद्ध केल्या. ‘विनोबांच्या संगतीत ‘ हे त्यांचं पुस्तक विशेष आहे. गीताई आणि गीताप्रवचनाच्या प्रसारासाठी ते राज्यभरात फिरले होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image