महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक दैनंदिन वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल 67 हजार 468 नवे कोरोनाबाधित आढळले. बाधितांची सर्वाधिक दैनंदिन वाढ मुंबई आणि पुण्यात आहे. कालच्या दिवसांत बरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा नवीन कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. काल 54 हजार 985 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 81 पूर्णांक 15 शतांश टक्के आहे. राज्यात काल 568 रुग्णांचा कोविड 19 मुळे बळी गेला.