नाशिक दुर्घटनेची चौकशी होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल नाशिकमध्ये केली. रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर त्यांनी ही घोषणा केली. या समितीत सात सदस्य असणार आहेत.