शहर कॉंग्रेसच्या वतीने कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरु : सचिन साठे

 

पिंपरी : ‘कोरोना कोविड -19’ च्या महामारीने राज्यापुढे फार मोठे संकट उभे केले आहे. राज्य स्तरावर प्रशासन, वैद्यकीय आणि आरोग्य विभाग महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या ध्यैर्याने व नियोजनबध्द पध्दतीने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करीत आहेत. मात्र जनतेच्या सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तो पर्यंत कोरोनावर मात करणे अशक्य आहे. त्यामुळे सामाजिक दायित्वाच्या भुमिकेतून कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यपातळीवर, अगदी गाव - खेड्यात, वॉर्ड स्तरापर्यंत या विषयी जनजागरण करुन कोविड रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता पुरविण्यासाठी ‘कोविड मदत व सहाय्य केंद्र’ सुरु करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील कोविड बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहाय्य करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने विजयनगर, काळेवाडी, पिंपरी येथे रविवार (दि. 11 एप्रिल) पासून ‘कोविड मदत व सहाय्य केंद्र’ सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी जनजागृती व जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी ‘सज्जी वर्की यांचे जनसंपर्क कार्यालय, साई इन्कलेव्ह, विजयनगर, काळेवाडी, पिंपरी पुणे -17’ येथील केंद्रातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या केंद्रातून रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता उपलब्ध व्हावी यासाठी मयुर जयस्वाल (9922146302), चंद्रशेखर जाधव (7218851885), विशाल कसबे (9850281908), मकरध्वज यादव (9922815267), कुंदन कसबे (9112465899), जिफिन जॉनसन (9822433695), आणि गौरव चौधरी (9665004794) हे पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत.

तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय व शिक्षण मंत्री अमित देशमुख, कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष अशोक जगताप, कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, अरिफ खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्हा कार्यालयात ‘कोविड सहाय्य व मदत केंद्र’ आणि 24X7 हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहेत. राज्य समन्वयक म्हणून निती भाऊराव पाटील हे काम पहात आहेत, अशी माहिती शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.


Popular posts
बोगदे खोदण्याचा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारण्याचा सल्ला - नीतीन गडकरी
Image
एमजी मोटर इंडिया तर्फे कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत कोव्हिड लसीकरण मोहिम आयोजित
Image
मातृदिनानिमित्त ट्रेल करणार 'आई' मधील प्रतिभेचा गौरव
Image
सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
पत्रकारांचं तातडीनं लसीकरण कराव, महसूल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Image